Tuesday, April 22, 2025
HomeUncategorizedगडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह...

गडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 23/05/2024 पोलीस स्टेशन, आष्टी हद्यीतील दारु तस्कर गोपाल पोयडवार, रा. पारडी, तह. लाखांदुर, जि. भंडारा हा त्याचा सहकारी अंजय्या पुल्लुरवार रा. पेठवार्ड ब्राम्हपूरी, जि. चंद्रपूर याच्या मार्फतीने चंद्रपुर जिल्ह्यातुन टाटा कंपनीच्या अरीया या चारचाकी वाहनाने पोस्टे आष्टी व पोस्टे अहेरी येथील चिल्लर दारु विक्रेत्यांना देशी-विदेशी दारुचा अवैधरित्या पुरवठा करण्याकरीता मोठ्या प्रमाणात दारुची खेप आणणार आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि. उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आष्टी येथे रवाना करण्यात आले. सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे कंसोबा मार्कंडा फाटा, आष्टी येथील फॉरेस्ट नाक्याजवळ दिनांक 23/05/2024 रोजी च्या दुपारी 12 ते 15.30 वा. चे दरम्यान सापळा रचुन उभे असतांना, सदरचे संशयीत चारचाकी वाहन हे भरधाव वेगाने कंसोबा मार्कंडा फाटा येथील फॉरेस्ट नाक्याजवळ पोहचताच पोलीसांनी सरकारी चारचाकी वाहनाने तात्पुरता अडथडा निर्माण केला असता, वाहन चालकाने वाहन वळवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फॉरेस्ट नाका खाली घेऊन पळुन जाणा­या वाहनास मोठ¬ा शिताफिने अडविले.

त्यानंतर सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात देशी दारुच्या 50 पेट्या दिसुन आल्याने पोलीसांनी सदर दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी वाहन असा एकुण 9,00,000/- (अक्षरी नऊ लाख रुपये) रुपयांचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त केला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे आष्टी येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम 65 (अ), 98 (2), 83 महा. दा. का. अन्वये आरोपी नामे गोपाल पोयडवार, रा. पारडी तह. लाखांदूर जि. भंडारा व अंजय्या पुल्लुरवार, रा. पेठवार्ड, ब्राम्हपूरी जि. चंद्रपूर यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा. व स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक श्री. उल्हास भुसारी यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राहुल आव्हाड, पोहवा/दिपक लेनगुरे, अकबर पोयाम, पोअं/श्रीकृष्ण परचाके, श्रीकांत बोईना व चापोअं/विनोद चापले यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!