Thursday, December 5, 2024
Homeमुलबेंबाळ परिसरात विजेचा खेळ खंडोबा

बेंबाळ परिसरात विजेचा खेळ खंडोबा

वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तिव्र आंदोलनाचा युवक काँग्रेसचा इशारा
मुल:- तालुक्यातील बेंबाळ परिसरातील विद्युत पुरवठा ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वारंवार खंडित होत असल्याने या परिसरातील जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच या परिसरातील उद्योगधंद्यावरही याचा मोठा परिणाम पडत आहे. मागील कित्येक वर्षापासून विद्युत पुरवठा खंडित होण्याचा त्रास या परिसरातील जनतेला सहण करावा लागत आहे. याबाबत युवक काँग्रेसने तक्रार ,निवदने दिलेले असूनसुद्धा याकडे संबंधित विद्युत विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. या क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारीही आपल्या कर्तव्यात कसूर करताना आढळून येत असून ही बाब अतिशय गंभीर असून सामान्य जनतेसाठी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची आहे. वारंवार खंडित होणारा पुरवठा सुरळीत करून ग्राहकांना सर्वसामान्य जनतेला सततच्या होणाऱ्या त्रासापासून दिलासा द्यावा करिता युवक काँग्रेसकडून सहायक अभियंता सावली यांना निवेदन देण्यात आले. जर एका आठवड्याच्या आत सदर विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही तर या विरोधात युवक काँग्रेस विद्युत कार्यालयासमोर विद्युत बिले जाळुन तीव्र आंदोलन करणार असा इशारा युवक काँग्रेसकडून देण्यात आला. निवेदन देताना युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे,पवन निलमवार, कांग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील वाढई,बेंबाळचे सरपंच चांगदेवजी केमेकार, उपसरपंच देवाजी ध्यानबोईवार, किशोर नंदिग्रामवार, माजी सरपंच विजय बोम्मावार, संदिप मस्के, निलेश बांगरे, गणेश निलमवार, विनोद वाढई,दिपक कोटगले तथा काँग्रेसचे कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.
कृपया ही बातमी आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्र न्यूज चैनल फोटो न्यूज वर प्रसिद्ध करावे ही विनंती
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!