मुल (प्रतिनिधी) शहरातील चौका-चौकात आणि गल्ली-बोळात मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी वावरत असल्याने सर्वसामान्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, पालिकेने या मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे शहरातील खाशाबा जाधव व्यायाम शाळा या भागात या पूर्वी कधी मोकाट जनावरे वावरताना आढळत नव्हते. मात्र, गेल्या एक वर्षापासून या भागात शेकडो मोकाट डुकरे, कुत्रे व गायांचे कळप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. मोकाट कुत्र्यांच्या झुंडी रस्त्यावर फिरत असतात. तेच कुत्रे माणसांच्या अंगावर चाल करत आहेत. डुकरांचे कळपावर कळप चोहीकडे दिसत असून, त्यामुळे अस्वच्छता पसरत आहे.मोकाट गायींनी या भागात कहर केला आहे. गाया रस्त्याच्या मधोमध बसत असल्यानेवाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मोकाट जनावरांची कमतरता म्हणून की काय मोठ्या संख्येने गाढवे वावरत आहेत. मोकाट जनावरांमुळे या भागातील नागरिकांचे जगणे कठीण झाले. शहरातील आरक्षित मोकळ्या जागेमध्ये ही जनावरे ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे प्रशासनाने या मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतुन होत आहे
स्वच्छ व सुंदर प्रभाग म्हणून शहरातील हा प्रभाग केवळ मोकाट जनावरांमुळे अस्वच्छ होत आहे. मोकाट सोडलेली कुत्रे , गायी, डुकरांचे मालक जनावरांच्या जीवावर पैसा कमवत आहेत. पालिका प्रशासनाने मोकाट जनावरांच्या मालकावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.