Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedएक गाव एक वाचनालय अंतर्गत नोंदणी केलेल्या विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावरुन एकुण 4500...

एक गाव एक वाचनालय अंतर्गत नोंदणी केलेल्या विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावरुन एकुण 4500 विद्याथ्र्यांनी दिला सराव पेपर

गडचिरोली पोलीस दलाच्या “प्रोजेक्ट उडाण”च्या माध्यमातून स्पर्धा परिक्षा सराव पेपरचे आयोजन

गडचिरोली (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

गडचिरोली जिल्ह्रातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्याथ्र्यांला योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­या विद्याथ्र्यांना स्पर्धा परिक्षेबद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना मिळत नसलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थी हे स्पर्धा परिक्षेत मागे पडत आहेत. करीता शालेय विद्याथ्र्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी व त्यांचा स्पर्धा परिक्षेकडे कल वाढावा तसेच त्यांना स्पर्धा परिक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मंुबई यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडाण” अंतर्गत काही दिवसांनी सुरु होणा­या पोलीस शिपाई भरती 2024 च्या पाश्र्वभूमीवर दिनांक 25/05/2024 रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालय येथील शहिद पांडु आलाम सभागृह तसेच एक गाव एक वाचनालयांतर्गत गडचिरोली जिल्ह्रातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रत्येक वाचनालयामध्ये मोफत पोलीस शिपाई भरती 2024 सराव पेपर क्र. 04 टेस्ट सिरीज चे आयोजन करण्यात आले. याचा उपयोग विद्याथ्र्यांना येणा­या पोलीस शिपाई भरती, संयुक्त परीक्षेकरीता होणार आहे.

यावेळी सदर स्पर्धा परीक्षा सराव पेपर करीता पोलीस मुख्यालय व विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावरुन एकुण 4500 विद्याथ्र्यांनी परिक्षा दिली. दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणी ही विद्याथ्र्यांनी उत्स्फुर्त प्रतीसाद दिला. तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र गर्देवाडा हद्दीतील 10 विद्याथ्र्यांनीही या सराव पेपरमध्ये सहभाग घेतला. अनेक ठिकाणी वाचनालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. या आयोजीत सराव पेपर दरम्यान मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सा. यांनी शहिद पांडु आलाम सभागृहामध्ये घेतलेल्या सराव पेपरला उपस्थित 1150 विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मुंबई नंतर सर्वात मोठी पोलीस शिपाई भरती ही गडचिरोली जिल्ह्रात होत असते. येणा­या परिक्षेला आज तुम्ही पूर्व तयारीनिशी तयार असणे आवश्यक आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्रामध्ये होतकरु विद्याथ्र्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना उचित व्यासपिठ उपलब्ध करुन देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल आहे. यासोबतच विद्याथ्र्यांनी इथेच न थांबता ज्या क्षेत्रामध्ये त्यांना आपले भवितव्य घडवायचे आहे त्यामध्ये असलेल्या सर्वोच्च पदापर्यंत पोहचण्याकरीता त्यांनी मेहनत घेतली पाहिजे. तसेच काही दिवसांनी सुरु होणा­या पोलीस शिपाई भरती पेपर करीता गडचिरोली पोलीस दलातर्फे शुभेच्छा दिल्या. या व्यतिरीक्त भविष्यात येणा­या वनरक्षक, आरोग्य सेवक, कृषी सेवक, इ. परिक्षांचे सराव पेपर सुरु करत असल्याबाबतची व पोलीस अधीक्षक कार्यालय येथे स्किलींंग इन्स्टीट¬ुुट मार्फत सुरु असणारे सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर व मिडीया डेव्हलपर कोर्सेस बाबत माहिती दिली.

या कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. तसेच समाज कल्याण गडचिरोलीचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/ उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!