मुल शहरातील चौखुंडे हेटी आणि बाजार समिती परिसरातील नागरिकांनी घेतला आखरी सुटकेचा श्वास….
मुल (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
काल रात्री सुमारे 10.30-11 वाजतेच्या दरम्यान एक रानगवा भटकुन मूल शहरातील चौखुंडे हेटी व बाजार समितीच्या आवारात फिरतांना येथील रहिवासियांना दिसल्याने एकच खळबळ उडाली. सुज्ञ नागरिक विक्की कोहळे यांनी याची सूचना संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मयसिंह झिरे, मनोज रणदिवे व योगेश गावंडे यांना दिली. माहीती मिळतात संस्थेच्या सदस्यांनी घटना स्थळी जाऊन, तो रानगवा आहे याची खात्री करून वन कर्मचारी यांना मोबाईलद्वारे माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी, संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य व स्थानिक नागरिकांनी त्या रानगव्याला सुरक्षित पणे जंगलाच्या दिशेने परतविले यावेळी मूल प्रादेशिक चे क्षेत्र सहाय्यक एम.जे. मस्के एफ. डी. एन. एन. चे क्षेत्र सहाय्यक आर.जी. कुमरे वनरक्षक एस.आर. ठाकुर उपस्थित होते.