चंद्रपूर (प्रतिनिधी)
शहरातील रहिवासी असलेले कवेश कष्टी ह्या मुलाने दहावी बोर्डात 87 60 टक्के गुण मिळवून उत्तम यश संपादन केले.
ज्ञानेश कष्टी हा विद्या विहार कॉन्व्हेन्ट चां विद्यार्थी असून त्याने कुठल्याही खासगी शिकवणी वर्ग न लावता.शाळेतील पाठ्यक्रम व घरी केलेली मेहनत ह्या बळावर दहावी बोर्डात 87 60 टक्के गुण मिळवत अनेक होतकरू विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे काम केले.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्यधापिका शोभा रेड्डी मॅडम, शिक्षक आणि आपल्या आईला दिले.
यश संपादन करण्यासाठी कुठल्याही खासगी शिकवणी वर्गाची आवश्यकता नसते.शाळेतील पाठ्यक्रम व स्व बळावर यश साध्य करता येते.अशी प्रतिक्रिया ज्ञानेश कष्टी ह्यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलतांना दिली.