मुल (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
आज स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुल येथील आज स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर शिक्षक फौंडेशन च्या वतीने नुकत्याच 10 वीच्या परीक्षेत मुल तालुक्यातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
अनुष्का प्रवीण ठावरी नवभारत कन्या विद्यालय, मुल ची विद्यार्थिनी 96.20 टक्के गुण घेत तालुक्यात प्रथम, प्राची लालाजी बावणे ही सेंट अंन्स हायस्कूल, मुल ची विद्यार्थी तालुक्यात द्वितीय 95.60 टक्के गुण, दिव्या किशोर नरड सेंट अंन्स हायस्कूल, मुल ची विद्यार्थी ही तालुकयात 95.40 गुण घेत तृतीय आली या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पालकांसोबत सत्कार करण्यात आला, सोबतच फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. फाउंडेशन च्या अध्यक्षा प्रा. डॉ. सौ. किरण कापगते(बोरकर), सचिव प्रविण मोहुर्ले व पदाधिकारी सर्वश्री सुखदेव चौथाले, युवराज चावरे, मधुकर शेंडे, आस्तिक मेश्राम, बबन गुंडावार, सौ गौतमी गेडाम (नखाते), सौ सुनीता श्रीवास्तव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.