मूल (प्रतिनिधी)
भारतीय स्वातंत्र्य सेनानी, समाज सुधारक, हिंदुत्व संकल्पनेचे प्रणेते क्रांतिवीर वि. दा. सावरकर यांची जयंती दिनांक 28 मेला भाजपा कार्यालय मुल येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरी करण्यात आली .यावेळी उपस्थितांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा ओबीसी मोर्चा चे मूल शहराध्यक्ष युवराज चावरे यांनी केले. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याची व योगदानाची माहिती दिली. त्यानंतर पंचायत समिती मूलचे माजी सभापती चंदू मारगोनवार, नगरपरिषद मूल चे माजी उपाध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, भाजपा नेते सुखदेव चौथाले यांनी क्रांतिवीर सावरकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार व देशभक्ती आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला नगरपरिषद मूलचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी नगरसेवक अजय गोगुलवार, अनील साखरकर, प्रशांत समर्थ, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत बोबाटे, बबन गुंडावार, विवेक मांदाडे ,आस्तिक मेश्राम, प्रशांत कोहळे व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक अनिल साखरकर यांनी मानले.