सिंदेवाही (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा रेती घाटा वरून रात्री च्या सुमारास ट्रॅक्टर द्वारे रेती ची तस्करी होत असून शेकडो ब्रास रेती चा उपसा झाल्यामुळे नदी पात्रात मोठे – मोठे गड्डे पडले आहेत. यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा नुकसान होत आहे. तर पर्यावरणाला ही याचा धोका असून महसूल विभाग ‘सेट’ तर नाही ना हा एक चर्चे चा विषय आहे.
या वर्षी रेती घाटाचे लिलाव न झाल्या मुळे रेती तस्करी करणाऱ्यांचे सुगीचे दिवस आले आहे. असाच एक उदाहरण सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा रेतीघाट असून रात्रीच्या वेळेस ट्रॅक्टर द्वारे रेतीची तस्करी होत असून शेकडो ब्रास रेती चा उपसा झाला असल्यामुळे नदी पात्रात मोठे – मोठे गड्डे पडले असून शासनाचा लाखो रुपयाचा नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. सर्वीकडे शासकीय बांधकामे सुरळीत सुरु आहे. मात्र घरकुल लाभार्थ्यांची मात्र पायचिट होत आहे. एका ट्रॅक्टर चे सुमारे अडीच ते 3 हजार रुपये मोजावे लागत आहे. रात्रभर ट्रॅक्टरनी रेतीची तस्करी होत असतांना महसूल विभागाला याची माहिती कशी नाही हा ही एक चर्चेचा विषय असुन, महसुल विभाग ‘सेट’ तर नाही ना? अशी ही चर्चा आता सर्व सामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे.