अहेरी (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला सुर्यापल्ली वरून काही कामानिमित्त्य जात असताना दुचाकी वरील संतुलन बिगडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला सुर्यापल्ली वरून काही कामानिमत्त आन्ध्रप्रदेशमध्ये गेले होते. व परत येत असताना. अहेरी वंगेपल्ली नदी येथे अपघात झाला. अपघातात दुर्दैवाने घटनास्थळावर राजू भगवान आत्राम वय 32 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला, त्यांना दोन मुले व दोन मुली, पत्नी असा परिवार आहे व सोबतच मुलचंद कंन्नाके हा गंभीर जखमी झाला आहे याला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.