मिर्झापूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात निवडणुकीच्या ड्युटीदरम्यान ९ कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिर्झापूरमध्ये उष्माघातामुळे कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये ६ होमगार्ड आणि ३ इतर सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर २० होमगार्ड कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशातील काही लोकसभा मतदारसंघात शनिवारी मतदान होणार आहे. या मतदानासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. या मतदानासाठी विविध विभागातील होमगार्डना मतदारसंघात तैनात करण्यात आलं आहे.
निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशातील मिर्झापुरात उष्णतेची लाट सुरु आहे. त्यात निवडणुकीच्या ड्युटीसाठी आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. यापैकी ६ होमगार्डचा मृत्यू झाला आहे. यात ६ होमगार्ड आणि ३ इतर सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर २० हून अधिक संशियत उष्माघात झालेल्या होमगार्डना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
उपचारादरम्यान ६ होमगार्डचा मृत्यू
निवडणुकीच्या ड्युटीसाठी आलेल्या ६ होमगार्डना ट्रॉमा सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांचा उपचारादरम्यान ६ होमगार्डचा मृत्यू झाला आहे. रामजियावन, सत्य प्रकाश, रामकरन, बच्चाराम, त्रिभुवन या मृत होमगार्डची नावे समोर आली आहेत. सध्या या ट्रॉमा सेंटरमध्ये २० होमगार्डवर उपचार सुरु आहेत. या होमगार्डना उष्माघातामुळे चक्कर येऊ लागल्या. डोळ्यासमोर अंधारी आली. त्यानंतर अनेक होमगार्ड बेशुद्ध झाले. मिर्झापूरमधील जिल्हाधिकारी प्रियंका निरंजन यांनी होमगार्डचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या होमगार्डनी त्यांना झालेल्या त्रासाविषयी माहिती दिली. उष्णतेच्या लाटेमुळे बेशुद्ध झाल्याचे सांगितले.