चंद्रपूर (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
देशात केरळसह काही राज्यात मौसमी पाऊस दाखल झाला आहे. राज्यात १० जूनच्या आसपास मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पण, त्या आधी राज्यात अनेक जिल्हे उष्णतेने होरपळून निघाले आहे.
आज विदर्भात काही जिल्ह्यात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रामुख्याने आज व उद्या विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे आज ऑरेंज अलर्ट तर उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज भंडारा व गोंदिया जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर ३१ ते १ जून पर्यंत कोकणात, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडण्याआधी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकणात आज व उद्या तर एक जून पासून संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस ३१ ते १ जून पर्यंत कोकणात, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे दोन व तीन जून रोजी मेघगर्जना वीजांचा कडकडाट व ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
आज व उद्या विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे आज ऑरेंज अलर्ट तर उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज भंडारा व गोंदिया जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. १ ते ३ जून रोजी भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर तर यवतमाळ येथे १ ते २ जून रोजी तर वर्धा येथे २ जून रोजी मेघ गर्जना वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा ताशी ५० किलोमीटर वेगाच्या वादळीवाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.