मानोरा (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
तालुक्यातील रोहना येथून पारवा ता. पुसद कडे जात असलेल्या दुचाकी स्वार महिला रस्त्यावर पडली असता त्याच दरम्यान भरधाव एसटी बसच्या चाकाखाली आल्याने घटनास्थळी सदर महिला ठार झाल्याची घटना गुरुवार, ३० मे रोजी सकाळी घडली.सदर दुर्दैवी घटना घडल्याबरोबर शेकडो ग्रामस्थ व प्रवासी यांची गर्दी घटनास्थळी जमा झाली होती.
सदर घटनेची माहिती प्राप्त होताच आसेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजितसिंह राजपूत, पोलिस जमादार देविदास पत्रे, किशोर मार्कड व अन्य कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन उपस्थित गर्दीला शांत केले व मृत महिलेचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार रोहना निवासी ५० वर्षीय मृतक महिलेच्या मुलाने ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीनुसार ते त्यांच्या आई मंदा गणेश गोडे मोटरसायकल क्र. एम एच २९ बी. एस. ९२४५ ने पुसद तालुयातील पारवा येथे दशक्रिया विधी कार्यक्रमासाठी जात होते. यादरम्यानच ढोणी गावाजवळ जवळ अचानक त्यांच्या आई दुचाकी वरून रस्त्यावर पडल्या त्याच वेळी मंगरूळनाथ एसटी डेपो ची बस क्र. एमएच ४० एन २१२९ च्या पुढील टायर खाली आल्याने मंदा गोडे यांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला अशी तक्रार एसटी बस चालका विरोधात नोंदविली आहे. सदरील चालकाविरोधात २७९,३३७,३३८,३०४ अ अंतर्गत प्रकरण नोंदविण्यात आले आहे. प्रकरणाचे पुढील तपास देविदास पत्रे,किशोर मार्कड यांच्या द्वारा करण्यात येत आहे.