Tuesday, November 12, 2024
HomeUncategorizedफ्लॅटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखाण्यावर धाड, एका दलाल आरोपीला अटक तर एका युवतीची...

फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखाण्यावर धाड, एका दलाल आरोपीला अटक तर एका युवतीची सुटका

चंद्रपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
चंद्रपूर शहराच्या मध्यभागातील अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड घालून शहर पोलिसांनी एका दलाल आरोपीला अटक केली. तर कुंटणखान्यातून एका पश्चिम बंगालमधील युवतीची सुटका केली. बुधवारी (दि.29) रात्री ही कारवाई करण्यात आली. प्रणय गेडाम असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दलालाचे नाव आहे.

रामाळा तलाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये प्रणय गेडाम यांनी फ्लॅट भाड्याने घेतला होता. या फ्लॅटमध्ये गेडाम यांनी एका ट्रॅव्हल्सच्या नावाने कार्यालय उघडले होते. या कार्यालयाच्या आड त्याने देह विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. या फ्लॅटमध्ये तो विविध युवतींना आणून कुंटणखाना चालवित होता. अपार्टमेंटमध्ये रोज नवनवे लोक येत असल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला. फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालत असल्याची कुणकुण अपार्टमेंटमधील नागरिकांना लागताच शहर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, बुधवारी पोलिसांनी संशयित फ्लॅटमध्ये डमी ग्राहक पाठविला. खात्री पटल्यानंतर धाड घालून फ्लॅटमधून प्रणय गेडाम या युवकाला ताब्यात घेण्यात आले. यावेळी फ्लॅटमध्ये एक युवती आढळून आली. तिची चौकशी केली असता ती पश्चिम बंगालमधील असल्याचे तिने सांगितले. तिची या कुंटणखान्यातून सुटका करण्यात आली. तर दलाल प्रणय गेडाम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या अपार्टमेंट देहविक्री व्यवसाय हा मागील दीड महिन्यापासून सुरू होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिली. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!