Thursday, March 20, 2025
HomeUncategorizedकोरची दरोडा प्रकरणाचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत उलगडा, 3 सराईत आरोपी जेरबंद

कोरची दरोडा प्रकरणाचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत उलगडा, 3 सराईत आरोपी जेरबंद

गडचिरोली : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

दिनांक 25/05/2024 रोजी नवेगांव बांध, जि. भंडारा येथील व्यापारी देवेश पटेल यांनी सोपान पेशने, रा. केशोरी यांचे ईर्टीगा चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. 35 ए.जी. 7001 ही भाड¬ाने घेवून वाहन चालकासह छत्तीसगड येथील वासडी येथे जावून सुगंधीत तंबाखु गडचिरोली मार्गे गोंदिया येथे नेत असतांना पोलीस स्टेशन, कोरची हद्दीतील मौजा मसेली जंगल परिसरात अज्ञात ईसमांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना अग्नीशस्त्राचा व इतर शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना बंदी करून त्यांच्या डोळ्यावर पट्टीवर बांधून त्यांना स्वत:च्या वाहनात बसवून दुस­या स्थळी हलविले. त्यानंतर सुगंधीत तंबाखु असणारी ईर्टीगा वाहन दुसरीकडे नेवून त्यातील संगंधीत तंबाखु जबरीने चोरून नेवून सदरचे वाहन कोरचीजवळ नेवून पेटवून दिले. अशा फिर्यादवरून पोलीस स्टेशन, कोरची येथे दरोडा व जाळपोळीचा गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला.

पोलीस अधीक्षक, श्री. नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी प्रकरणाचे गांभीर्य बघून तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी यांना घटनास्थळ भेट देवून गुन्हा निष्पन्न करण्याबाबत आदेशित केल्याने स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची स्वतंत्र 03 पथके तयार करून संपुर्ण परिसर पिंजून काढून, त्यांचे गोपनिय बातमीदारांचे जाळे कार्यान्वीत करून माहिती घेतली असता सदर परिसरात मागील 2-3 वर्षात याचसारख्या 2 ते 3 घटना घडलेल्या असून त्यात काही लोकांना मारहाण देखिल झाल्याची माहिती मिळाली. परंतु, संबंधीत फिर्यादी हे अवैद्य व्यवसायाशी निगडीत असल्याने व आरोपींची दहशत असल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली नाही. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने तपासाचे धागे एकत्र करून माहिती संकलीत केली असता गडचिरोली-गोंदिया सिमावर्ती भागातील मौजा राजोली, जि. गोंदिया येथील सुगंधीत तंबाखुची तस्करी करणारा शोएब वकिल सय्यद हा त्याचे साथीदारांसह त्याचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी यांच्यात त्याची दहशत राहावी या उद्देशाने गुन्हे करीत असल्याची माहिती मिळाली.

दिनांक 01/06/2024 रोजी मौजा राजोली येथे जावून, सापळा रचून ईजराईल हकिम शेख, लोकेश हंसराज नगारे व प्रशांत मोहन सांगोळे यांना ताब्यात घेवून कसून विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्राची कबुली देवून त्यांचेसह आणखी साथीदार असल्याचे सांगीतल्याने नमूद तिन्ही आरोपीतांना सदर गुन्ह्राचे तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. रविंद्र भोसले यांचे ताब्यात पुढिल तपासकामी देण्यात आले. उर्वरीत आरोपीतांचा शोध घेणे सुरु आहे.

यासारखा प्रकार अथवा घटना इतर कोणासोबत घडली असल्यास त्यांनी नि:संकोच व निर्भीडपणे पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार द्यावी. त्यांच्या तक्रारीची योग्य दखल घेण्यात येईल. असे आवाहन पोलीस अधीक्षक, गडचिरोली, श्री. नीलोत्पल यांनी गडचिरोली जिल्ह्रातील सर्व जनतेला केलेले आहे. सदर कारवाई दरम्यान पोलीस निरीक्षक, उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड, म.पोलीस उपनिरीक्षक, सरीता मरकाम, पोहवा राकेश सोनटक्के, देवेंद्र बांबोळे, अकबरशहा पोयाम, मपोहवा पुष्पा कन्नाके, पो.ना शुक्राचारी गवई, पंकज भगत, माणिक निसार, पोशि माणिक दुधबळे, रोहन जोशी, सुनिल पुठ्ठावार, सचिन घुबडे, संजु कांबळे, क्रिष्णा परचाके, प्रशांत गरफळे, दिपक लोणारे, विनोद चापले, मपोशि सोनम जांभुळकर, फोटोग्राफर देवेंद्र पिदुरकर, सर्व नेमणुक स्थागुशा, गडचिरोली व सायबर पोलीस स्टेशनचे पोउपनि निलेशकुमार वाघ व नापोशि श्रिनिवास संगोजी तसेच पोलीस स्टेशन, गडचिरोली चे पोउपनि बालाजी सोनुने व चापोहवा शंकर अरवेल्लीवार, मोपवि गडचिरोली यांनी अथक परिश्रम घेवून गुन्हा उघडकिस आणला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!