मूल : (प्रतिनिधी)
31 मे रोजी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती अहिल्यादेवी होळकर चौक येथे साजरी करण्यात आली.धनगर/कुरमार समाजाचे जेष्ठ नागरिक श्री बंडू जी मर्लावार यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर प्रतिमा पूजन व मालार्पण करून अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर जीवन कार्याबद्दल धनगर बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने धनगर/कुरमार समाज बांधव उपस्थित होते धनगर/कुरमार बांधवांच्या वतीने येळकोट येळकोट जय मल्हार नावाने जयघोष देण्यात आले. धनगर समाजाच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता धनगर समाजातील सामाजिक कार्यकर्ते नितेश मॅकलवार,विनोद मिडपल्लीवार आकाश आरेवार वासुदेव कंकलवार निलेश मॅकलवार,सोमाजी कटकेलवार,ईश्वर रेगलवार,अशोक डेंकरवार,नरेश मॅकलवार ,पोचूजी कटकेलवार,मिराबाई अल्लीवार,वनिता उमलवार,शालुबाई मेडीवार,बेबीबाई अन्नावार,तसेच धनगर/कुरमार समाज बांधव युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.