डॉ. अभिलाषा गावतुरे मित्र परिवारा तर्फे फटाके फोडून केला जल्लोष साजरा
मुल : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
कांग्रेसचे प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघातून विजय झाल्या बद्दल डॉ. अभिलाषा गावतुरे मित्र परिवारातर्फे मुल येथील गांधी चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून कांग्रेस चे उमेदवार प्रतिभा धानोरकर आणी भाजपा चे सुधीर मुनगंटीवार यांच्यात थेट लढत होती, या लढती मध्ये प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांना 2 लाखाच्या मताधिक्यानी हरवून विजय झाले आहे. या निवडणुकी मध्ये पहिल्या फेरी पासून अखेरच्या फेरीपर्यंत प्रतिभा धानोरकर हे आघाडी वर राहत अखेर 2 लाखांच्या वर मताधिक्यांनी विजय मिळविला आहे. या विजयाचा जल्लोष डॉ. अभिलाषा गावतुरे मित्र परिवारा तर्फे फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे. या वेळी डॉ. राकेश गावतुरे, तौशीब सय्यद, राकेश मोहुर्ले, कैलास चलाख, संतोष चिताडे, अभय चिटलोजवार आणी सौरव वाढई सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.