हैद्राबाद : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
साऊथ इंडस्ट्रीमधील एक मोठं नाव आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन झालं आहे. आज 8 जून 2024 रोजी पहाटे 4 वाजून 50 वाजता त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला.
उच्च रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत असल्याने ५ जूनला त्यांना हैद्राबाद येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. अखेर मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली आणि रामोजी राव यांची प्राणज्योत मालवली. रामोजी राव यांच्या निधनाने दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांना ‘आयकॉनिक मीडिया बॅरन’ आणि ‘फिल्म मोगल’ असं म्हटलं जायचं. त्यांचं पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव होतं. रामोजी राव यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला होता. रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही नेटवर्कचे ते मालक होते. रामोजी राव हे माध्यम विश्वातील एक मोठे व्यक्तिमत्व मानले जातात.आत्तापर्यतच्या त्यांच्या एकूण कामगिरीबद्दल 2016 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.