Thursday, March 20, 2025
HomeUncategorizedजम्मू काश्मीरच्या रियासी मध्ये दहशदवाद्याचा बसला गोळीबार, 10 यात्रेकरू ठार; अनेक जखमी

जम्मू काश्मीरच्या रियासी मध्ये दहशदवाद्याचा बसला गोळीबार, 10 यात्रेकरू ठार; अनेक जखमी

जम्मू : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

जम्मू-कश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूची एक बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक अहवालानुसार दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. डीडी न्यूजने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.

जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी दहशतवाद्यांनी एका बसला लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर यात्रेकरूंनी भरलेली बस खोल दरीत कोसळली. बस दरीत कोसळ्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. इतर अनेक प्रवासीही जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. डीसी रियासी विशेष महाजन यांनी याला दुजोरा दिला आहे. घटनास्थळावरील दृश्यांमध्ये स्थानिक लोक बचाव कार्यात मदत करत आहेत. तसेच रुग्णवाहिका तातडीने मदतीसाठी रस्त्याच्या कडेला दाखल झाल्या आहेत. जखमींना रुग्णालयात हलवले जात आहे.

बसमधील महिलेने हशतवादी हल्ल्याला दुजोरा दिला दुजोरा

प्राथमिक माहितीचा हवाला देत अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिव खोडी मंदिरात जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर पोनी परिसरातील तेरायथ गावात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर बस दरीत कोसळली. बचाव कार्य सुरू करण्यात आले असून पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. यासोबतच बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेने दहशतवादी हल्ल्याला दुजोरा दिल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

डीपीएपीने या हल्ल्याचा निषेध केला

डीपीएपी प्रवक्त्या अश्विनी हांडा यांनी या घटनेवर निवेदन दिले आहे. त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्या म्हणाल्या की, एकीकडे देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली जात आहे आणि दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या रियासीमध्ये दहशतवाद्यांनी एका बसला लक्ष्य केले आहे. दहशतवाद्यांनी बसवर हल्ला करून 10 प्रवाशांची हत्या केली आहे. दहशतवादी घटना थांबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!