चंद्रपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
राज्यात मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
या एकूण परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. येथून पुढे २४ तास अतिशय महत्वाचे असून दक्षिण कोकण, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आज तर, उद्या कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुढील काही तासांमध्ये मुंबईसह उपनगर, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.