दिल्ली : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
दिल्लीच्या तख्तावर तिसऱ्यांदा बसताना नरेंद्र मोदी यांनी आपला तिसरा शाही शपथविधी आटोपला. मोदींसह ७२ जणांनी शपथ घेतली. भाजपसह मित्रपक्षांनाही मंत्रिपदे वाटून मोदींनी पूर्वीच्या एककल्ली मोहीमेला ब्रेक लावल्याचे त्यांनी दाखवून दिले.
या मंत्रिमंडळात नवी समीकरणे जुळवितांना प्रादेशिक समतोल राखला. एनडीएतील मित्र बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनाही केंद्रात मान देण्यात आला. त्याचवेळी केरळमध्ये भाजपने शिरकाव करुन निवडून आणलेल्या सुरेश गोपी या एकमेव खासदारालाही काल कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. मात्र शपथविधीनंतर जेमतेम बारा तासांतच त्यांनी राजीनाम्याची तयारी ठेवल्याचे समजते.सरकार स्थापन करुन काही तासांतच मंत्र्याचा राजीनामा होत असल्याचे मोदी-शहांसाठी हा धक्का असू शकतो, मात्र वैयक्तिक कारणामुळे म्हणजे यांनी चित्रपट ‘साइन’केल्याने राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येते शुटींग असल्यामुळे वेळ देता येणार नाही म्हणून त्यांनी मंत्रिपद नाकारले आहे. मात्र या राजीनाम्याची चर्चा वेगवेगळ्या अंगाने होत आहे.
सुरेश गोपी यांचा राजीनामा स्वीकारला जाणार असल्याचे समजते. मी मंत्रिपद मागितले नव्हते, त्यामुळे मला लवकरच पदमुक्त करावे, अशी विनंती त्यांनी पक्षश्रेष्ठींना केली आहे. सुरेश गोपी हे त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहे.
सीपीआईचे उमेदवार वी.एस. सुनीलकुमार यांना त्यांनी 74 हजार 686 मतांनी पराभूत केले आहे.गोपी हे राज्यसभेचे खासदारही होते. 1998 मध्ये आलेल्या ‘कलियाट्टम’या त्यांच्या चित्रपटाला ‘बेस्ट ॲक्टर’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.