मुल : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
IIT मध्ये प्रवेश घेण्याकरिता यावर्षी घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व परीक्षा JEE ऍडव्हान्स 2024 मध्ये कु. तनवी कैलाश चलाख ईने ऑल इंडिया रँक कॅट 5783 मिळवून आयआयटी कॉलेज मधून इंजिनिअरिंग करण्यासाठी पात्र ठरली आहे.
यापूर्वी तिने JEE Mains मध्ये BE/B. Tech & Barch या पेपर मध्ये अनुक्रमे 99.176 आणि 99.626 टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले आहे.
तिने एच.एस.सी. जनता करिअर लांचर मधून 89.67% गुण घेवून कॉलेज मधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाचे श्रेय ती आपल्या आई-वडिलांना तसेच तिचे मोठे वडील आणि मार्गदर्शक श्री. वैंकटस्वामी चलाख आणि शिक्षकवृंद यांना दिले. यावेळी तिचे आणि आई वडिलांचे अभिनंदन आणि पुढील शिक्षणासाठी तिला शुभेच्छा देण्या करिता विदर्भ तेली समाज महासंघाचे पदाधिकारी श्री.गंगाधर कुंनघाडकर सर, श्री .विजय भुरशे सर,श्री. राजेश सावरकर सर, श्री. सुरेश टिकले सर, श्री. किरण खोब्रागडे सर, श्री.प्रशांत भाऊ भरतकर यांनी पुष्पगुच्छ आणि पेढे भरवून तिचा सत्कार केला.