अर्जुनी मोर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
अनैतिक संबंधात अडसर ठरणार्या पतीचा पत्नीने गळा आवळून खून केल्याची घटना तालुक्यातील ईसापूर (इटखेडा) येथे आज 12 जून रोजी उघडकीस आली. मेघशाम कुंडलिक भावे (42) मृताचे नाव आहे. तर वैशाली मेघशाम भावे (38) रा. ईसापूर असे आरोपी पत्नीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मंगळवारी रात्री 10 सुमारास जेवन करून भावे कुटुंबिय झोपी गेले. सकाळ होऊनही मुलगा जागा झाला नसल्याने वडील कुंडलिक यांनी मेघशामला हाक दिली. मात्र प्रतिसाद न मिळाल्याले कुंडलिक यांनी मेघशामच्या शरिराला हालविले. दरम्यान त्याचा शरीर थंड पडला होता. अधिक पाहणी केली असता मेघशामचा मृत्यू झाल्याचे निर्देशनास आले. मुलाचा आकस्मित मृत्यू झाल्याचे समजून अंत्यविधी तयारी करण्यात आली. नातेवाईकांना माहिती देण्यात आली. दुपारी 1 वाजेच्या सुमारास अंत्यविधीसाठी प्रेताला आंघोळ घालत असताना मेघशामच्या गळ्यावर व्रण दिसले. हा प्रकार घातपातचा असल्याचे आई-वडील व नातेवाईकांच्या लक्षात आले. येथील पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी भावेंचे घर गाठून पंचनामा करून प्रेत उत्तरिय तपासणीसाठी पाठविले. संशयावरून वैशाली व तिच्या बहिनीच्या मुलीला ठाणेदार विजयानंद पाटील, बीट अंमलदार डोंगरवार यांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता मेघशामचा गळा आवळून हत्या केल्याचे सांगीतले. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे बोलले जाते. पोलीस सर्वच दिशेने तापास करीत असून या प्रकरणात अनेक मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.