Tuesday, February 11, 2025
HomeUncategorizedनितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश पुजारीने कोर्टात 'पाकिस्तान जिंदाबाद'...

नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश पुजारीने कोर्टात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ ची केली घोषणा, संतप्त नागरिकांनी केली धुलाई

बेळगांव : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

बेळगावमध्ये कोर्ट परिसरात गुंड जयेश पुजारीला नागरिकांकडून मारहाण करण्यात आली आहे. आयपीएस अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी कुख्यात गुंड जयेश पुजारी अटकेत आहे. याप्रकरणी आज त्याला बेळगाव कोर्टात हजर करण्यात आलं.

कोर्टात सुनावणीदरम्यान त्याने अनेकदा ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. कोर्ट आणि पोलीस माझं म्हणणं ऐकत नाही असं सांगत जयेश पुजारी याने भर कोर्टात या घोषणा दिल्या. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला कोर्टा बाहेर आणताच परिसरात मारहाण केली.

जयेश पुजारीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान त्याने एका आयपीएस अधिकाऱ्यालाही धमकावलं होतं. जयेश पुजारी सध्या अटकेत असून हिंडलगा जेलमध्ये बंद आहे. त्याला आज बेळगाव कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्याने आपण पोलिसांसमोर वारंवार आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत असता ते ऐकून घेत नसल्याचा आरोप करत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

जयेश पुजारीने ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याने नागरिक संतापले होते. पोलीस त्याला घेऊन कोर्टाच्या बाहेर येताच त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलीस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाही नागरिक मात्र मागे हटण्यास तयार नव्हते. यादरम्यान तो माझे काही कागदपत्रं खाली पडली आहेत असं सागंण्याचा प्रयत्न करत होता. नागरिक संतप्त झाल्याने कोर्ट परिसरात काही वेळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!