Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedखा. प्रतिभा धानोरकर यांचा विधानसभा अध्यक्षाकडे आमदार पदाचा राजीनामा सुपूर्द...

खा. प्रतिभा धानोरकर यांचा विधानसभा अध्यक्षाकडे आमदार पदाचा राजीनामा सुपूर्द…

चंद्रपूर (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

वरोरा विधानसभेच्या माध्यमातून जनतेने आमदार म्हणून निवडून दिल्यावर २०१९ ते २०२४ या कालावधीत विधानसभेच्या माध्यमातून जनसामान्यांची संपूर्ण कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त करीत गुरुवारी विधानसभेच्या अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला.दरम्यान विधानसभा सचिवालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

अलिकडेच लोकसभा निवडणूक पार पडून त्यामध्ये चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार पदांची धुरा प्रतिभा धानोरकर यांच्याकडे आली. खासदारपदी निवडून आल्याने गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार पदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी अध्यक्षांनी प्रतिभा धानोरकर यांना भावी राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांनी विधानसभेत केलेल्या कार्याबद्दल कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!