Thursday, March 20, 2025
HomeUncategorizedमला तिकीट मिळू नये, त्यासाठी आपल्याच पक्षातील लोकांनी सुपारी दिली - प्रतिभा...

मला तिकीट मिळू नये, त्यासाठी आपल्याच पक्षातील लोकांनी सुपारी दिली – प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली.

आगामी काळात राज्यात सत्ता आली तर मंत्रिमंडळात गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील आमदाराला नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील आमदाराला मंत्रीपद मिळावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्या म्हणाल्या. आपल्याला तिकीट मिळू नये यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना आपल्याच पक्षातील लोकांनी सुपारी दिली, पैशाचे आमिष दाखविल्याचा केला धक्कादायक आरोप यावेळी प्रतिभा धानोरकर यांनी केला.

चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली. चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या लोकसभा क्षेत्रात सध्या धन्यवाद सभा आयोजित केल्या जात आहेत. बुधवारी संध्याकाळी राजुरा शहरात रॅलीनंतर आयोजित केलेल्या धन्यवाद सभेत बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आगामी काळात राज्यात सत्ता आली तर मंत्रिमंडळात गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील आमदाराला नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील आमदाराला मंत्रीपद मिळावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान केले. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार हे गडचिरोली लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या ब्रम्हपुरी मतदारांचे आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा रोख वडेट्टीवार यांच्याकडेच होता, अशी चर्चा आहे.

मला तिकिट मिळू नये म्हणून पैशाचे आमिष दाखवले

याच सभेत बोलतांना त्यांनी आपल्याला तिकीट मिळू नये व आपला विजय होऊ नये यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना सुपारी दिली गेली, पैशाचे आमिष दाखवले गेले असा धक्कादायक आरोप देखील केला. आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभा क्षेत्रातील सर्व 6 तिकिटे आपण वाटणार असल्याचेही धानोरकर यांनी उत्साहाच्या भारत जाहीर केले.

खासदार प्रतिभा धानोरकरांचे कृत्य बालिशपणाचे- आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या निवडून आल्या. यावेळी त्यांनी मला भाजपच्या गोटातूनच मदत मिळाल्याने माझा विजय झाल्याचे वक्तव्य केले होते. यावर वनी मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी टीका केली. ते म्हणाले की, प्रतिभा धानोरकर यांचे हे वक्तव्य बालिशपणाचे आहे. खासदार धानोरकर यांना ज्या कोणी नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मदत केली त्यांचे नावे स्पष्टपणे सांगावे. त्याच्यावरती 24 तासात कारवाई करण्यात येईल. त्यांना खोटे बोलण्याची सवय आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!