Tuesday, April 22, 2025
HomeUncategorizedवृद्ध महिलेला भरधाव वाहनाची धडक, महिलेचा जागीच मृत्यू

वृद्ध महिलेला भरधाव वाहनाची धडक, महिलेचा जागीच मृत्यू

अमरावती : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

बडनेरा एसटी डेपो समोरील चौकात एका भरधाव वाहनाने 75 वर्षीय वृद्ध महिलेला धडक दिली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि. 13) घडली. अनुसया रामकृष्ण अवतारे असे मृत महिलेचे नाव आहे.

मृत महिलेजवळ असलेल्या बँकेच्या पासबुकच्या सहाय्याने त्यांची ओळख पटली. दरम्यान या अपघातानंतर बडनेरा पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. अपघातानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्यावरून आरोपी वाहन चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

बडनेरा बस डेपो समोरच ही घटना झाल्याने काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. बडनेरा शहरामध्ये सहा वाहतूक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी दोन जय हिंद चौक, दोन बस डेपो समोर आणि दोन कर्मचारी अलमास गेट समोर नियुक्त असतात. मात्र फिक्स पॉईंट वर वाहतूक पोलीस कर्मचारी राहत नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे,असे नागरिकांचे मत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!