चंद्रपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
मागील चार महिन्यात पती-पत्नीच्या भांडणाची 477 प्रकरणे भरोसा सेलकडे आली. समुपदेशनातून 103 दाम्पत्यांचा विस्कटलेला संसार रूळावर आणण्यात भरोसा सेलला यश आले
विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या प्रकारच्या प्रकरणांत घट दिसून येत आहे. पण हुंड्याची प्रकरणे येतच आहेत. याबाबत पोलिस प्रशासनाकडून पाऊले उचलणे गरजेचे आहे. अनेक सुसंस्कृत कुटुंबात हुंड्यासाठी छळ होताना दिसून येते. मात्र, बदनामीच्या भीतीपोटी अनेक जण समोर येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती दिसून येत नाही.
माहेरच्या पैशांवर डोळा ठेवून असलेली मंडळी सुनेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात कुठलीच कसर सोडत नसल्याचे दिसून येते. पोलिसांकडे आलेल्या तक्रारींवरून हे दिसून येते. पती पत्नीच्या वादाचा प्रकार भरोसा सेलकडे आल्यानंतर समुपदेशनातून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करुन समेट घालण्यात येतो. मागील चार महिन्यात भरोसा सेलकडे विविध प्रकारच्या आलेल्या एकूण 477 प्रकरणांपैकी तब्बल 103 प्रकरणात समेट घालण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. मागील चार महिन्यात भरोसा सेलकडे पती पत्नीच्या वादाची 477 प्रकरणे आली. त्यापैकी 103 प्रकरणात समेट घडवून आणण्यात यश आले आहे. कोणत्याही महिलेचा छळ होत असल्यास त्यांनी न घाबरता संपर्क करावा, असे आवाहन भरोशा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम यांनी केले आहे.