Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedनागपूरातील पुरुषोत्तम पुट्टेवार सुपारी किलिंग प्रकारण; बड्या काँग्रेस नेत्याचं नाव समोर

नागपूरातील पुरुषोत्तम पुट्टेवार सुपारी किलिंग प्रकारण; बड्या काँग्रेस नेत्याचं नाव समोर

नागपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

नागपूरच्या पुरुषोत्तम पट्टेवार हत्याकांड प्रकरणात गडचिरोलीच्या देसाईगंज येथील एका काँग्रेस नेत्याचं नाव पुढे येत आहे.

आता अटक टाळण्यासाठी हा नेता राज्यातील एका मोठ्या नेत्याचा माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संपत्तीसाठी सुपारी देऊन सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगर रचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ एमएसएमईचा संचालक प्रशांत पार्लेवार यांना कट रचण्यात मदत केल्याचा या काँग्रेस नेत्यावर संशय आहे.

कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेले पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा 22 मे रोजी मुलीच्या घरी पायी जात असताना मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. अजनी पोलिसांनी तडकाफडकी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुरुषोत्तम त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ. मनीष, सून अर्चना आणि मुलगी योगिता आहे. सुक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक प्रशांत पार्लेवार याचा मोठा भाऊ प्रविणची योगिता ही पत्नी असून तिने पार्लेवारच्या संपत्तीतील वाटा मिळावा म्हणून न्यायालयीन लढा सुरू केला होता.

पुरुषोत्तम पुट्टेवार हत्याकांड प्रकरणाशी काँग्रेस नेत्याचं कनेक्शन काय?

नागपूरच्या पुरुषोत्तम पुट्टेवार हत्याकांड प्रकरणात गडचिरोलीच्या देसाईगंज येथील एका काँग्रेस नेत्याचे नाव पुढे येत आहे. या काँग्रेस नेत्याला गडचिरोलीमध्ये कोळसा पट्टा हवा होता, तर अर्चना पुट्टेवार ला आपली बदली हि प्रमोशन सह चांगल्या जागेवर पोस्टिंग हवी होती त्यामुळे हे एकत्र आल्याचे बोलले जात आहे. आता अटक टाळण्यासाठी हा नेता राज्यातील एका मोठ्या नेत्याचा माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संपत्तीसाठी सुपारी देऊन सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगर रचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ एमएसएमईचा संचालक प्रशांत पार्लेवार यांना कट रचण्यात मदत केल्याचा या काँग्रेस नेत्यावर संशय आहे. कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेले पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा २२ मे रोजी मुलीच्या घरी पायी जात असताना मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला होता.

अजनी पोलिसांनी तडकाफडकी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुरुषोत्तम त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ. मनीष, सून अर्चना व मुलगी योगिता आहे. सुक्ष्म-लघू व मध्यम उद्योग विभागाचे संचालक प्रशांत पार्लेवार याचा मोठा भाऊ प्रवीणची योगिता ही पत्नी असून तिने पार्लेवारच्या संपत्तीतील वाटा मिळावा म्हणून न्यायालयीन लढा सुरु केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!