Tuesday, February 11, 2025
HomeUncategorizedपोलीस कस्टडीत असलेल्या एकाचा मृत्यू; पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

पोलीस कस्टडीत असलेल्या एकाचा मृत्यू; पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

अमरावती : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

चांदुर रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रितेश मेश्राम याचा अमरावती मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान त्याचा मृत्यू हा कारागृहात झालेल्या मारहाणीत झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

तसेच जोपर्यंत आरोपी पोलिसांना अटक होत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांची घेतली आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील रहिवासी रितेश मेश्राम याला कोर्टामध्ये तारखेवर हजर न राहिल्याने चांदूर रेल्वे पोलिसांनी सोमवारी सकाळी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याचे चांदूर रेल्वे येथे मेडिकल सुद्धा करण्यात आले. मात्र ज्यावेळी त्याची रवानगी अमरावती मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली; तेव्हा तेथील अधीक्षकांनी रितेश मेश्राम हा अनफिट असल्यास सांगितले. यामुळे त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

नातेवाईकांनी केला आरोप

मात्र, माझ्या भावाला ज्यावेळी पोलिसांनी नेले. तेव्हा तो चांगला होता. त्याला कुठल्याही प्रकारचा मार नव्हता. मात्र आता त्याच्या शरीरावर जखमा आहे. त्यामुळे पोलिसांनी माझ्या भावाला कस्टडीमध्ये मारले असल्याचा आरोप त्याच्या बहिणीने केला आहे. तर १३ जूनला तुमच्या मुलाची जमानत झाली आहे. मात्र तुमच्या मुलाला बरं नाही असं सांगून माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आलं. मात्र माझ्या आईला उशिरापर्यंत माझ्या भावाला भेटू दिलं नाही. त्यानंतर तो मृत पावल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला कस्टडीमध्येच मारल्याचा संशय आहे, त्यामुळे त्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतकाच्या भावाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!