बेंगळुरू : (सतीश आकुलवार, मुख्य आकुलवार)
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांच्याविरुद्ध बेंगळुरू न्यायालयाने गुरुवारी (दि.13) पोक्सो प्रकरणात
अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
येडियुरप्पा यांनी नवी दिल्लीत असल्याचे सांगून हजर होण्यासाठी वेळ मागितल्यानंतर सीआयडीने वॉरंटची विनंती केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे येडियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायदा आणि लैंगिक छळाच्या आरोपाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येडियुरप्पांनी 2 फेब्रुवारी बेंगळुरूच्या डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी एका बैठकीदरम्यान तक्रार दाखल केलेल्या महिलेच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
येडियुरप्पा सध्या दिल्लीत आहेत. त्यांच्या विरुद्ध पोक्सो प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीने येडियुरप्पा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. याआधी गृहमंत्र्यांनी सांगितले होते की, गरज पडल्यास सीआयडी येडियुरप्पाला अटक करू शकते. सीआयडीने येडियुरप्पा यांना गुरुवारी (दि.12) या प्रकरणी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु येडियुरप्पा यांनी सांगितले होते की ते दिल्लीत आहेत त्यामुळे 17 जून रोजी सीआयडीसमोर हजर होतील.
काय प्रकरण आहे?
14 मार्च रोजी एका महिलेने बेंगळुरू येथील सदाशिवनगर पोलिस स्टेशनमध्ये येडियुरप्पा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार महिलेने जेव्हा त्या दोघी काही कामासाठी येडियुरप्पा यांच्या घरी गेल्या होत्या, तेव्हा येडियुरप्पा यांनी तिच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. असा आरोप केला होता. प्रकरण गंभीर असताना कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला होता. बीएस येडियुरप्पाही या प्रकरणात एकदा सीआयडीसमोर हजर झाले होते.
तक्रारदार महिलेचा संशयास्पद मृत्यू
दि. 26 मे रोजी तक्रारदार महिलेचा अचानक मृत्यू झाला. यामागे ती अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पीडितेच्या भावाने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करून येडियुरप्पा यांच्या अटकेची मागणी केली होती. बीएस येडियुरप्पा यांनीही हे पोक्सो प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान येडियुरप्पा यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले होते. मात्र, आता अटक वॉरंट जारी झाल्यानंतर येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.