लाखो रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त, आरोपी लखन मानकानी फरार
मुल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह…?
मुल : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने काल दिनांक 14 जुन 2024 रोजी सायं. साडे चार ते 5 वाजताच्या दरम्यान मुल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राजोली या गावामध्ये एका घरी असलेल्या गोडाऊन वर धाड टाकून अवैद्य प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुसह लाखोचा माल जप्त केला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी मुल येथील लखन मानकानी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मुल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राजोली या गावांमध्ये मुल येथील लखन मानकानी हा एका घरी गोडाऊन म्हणून एक खोली किरायाने घेतला असून तिथे अवैद्य प्रतिबंधीत सुनगंधित तंबाखू चा साठा ठेवला असल्याची माहिती मिळाल्या नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गडादे, पोहवा. दिपक डोंगरे, पोशी. गोपीनाथ नरोटे, अमोल सावे यांनी धाड टाकून 5 प्लास्टिक चुंगडया मध्ये 800 पाऊच प्रत्येकी 200 ग्राम वजनाचे होला हुक्का शिशा तंबाखु ने सिलबंद असलेले पाऊच व एकूण 200 डब्बे प्रत्येकी 50 ग्राम वजनाचे मजा, 108 हुक्का शिशा तंबाखु ने भरलेले सिलबंद डब्बे असा एकूण एक लाख 78 हजार 200 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
याची माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला होते परंतु मुल पोलिसांना नाही हे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होते.