Tuesday, November 12, 2024
HomeUncategorizedअवैध गौण खनिज उत्खननावर आळा घालण्याकरीता जिल्हास्तरीय भरारी पथक गठीत

अवैध गौण खनिज उत्खननावर आळा घालण्याकरीता जिल्हास्तरीय भरारी पथक गठीत

गडचिरोली : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

जिल्ह्यातील नदीपात्रातून व इतर ठिकाणाहून होणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर आळा घालण्याकरीता व शासकीय महसूलाचे नुकसान टाळण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जिल्हास्तरीय भरारी पथकाची नेमणूक केली आहे.

या भरारी पथकात तहसिलदार, नायब तहसिलदार, तलाठी आणि महसूल सहाय्यक यांचा समावेश आहे.

या भरारी पथकाला अवैध गौण खनिज उत्खनन बाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करणे, संबंधीत ठिकाणी भेट देवून मौका पंचनामा, जप्तीनामा करणे, उपस्थितांचे जवाब घेणे व उत्खनन झालेल्या ठिकाणाची संबंधीत तालुक्याचे तहसिलदार, उपअधिक्षक भूमी अभिलेख यांचे उपस्थितीमध्ये मोजणी करुन पंचनामे तयार करणे, कारवाईच्या वेळेस आवश्यकता वाटल्यास पोलीस संरक्षण घेणे, केलेल्या कार्यावाहीच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल अभिप्रायासह व अभिलेख जिल्हाधिकारी यांना तातडीने सादर करणे, प्राप्त तक्रारी व त्यावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने विहित नोंदवहीत नोंदी ठेवणे आदी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून संपूर्ण कार्यवाही दरम्यान गोपनियता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!