Tuesday, February 11, 2025
HomeUncategorized'पुट्टेवार’प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गप्प का?; पोलीस कारवाईवरही प्रश्नचिन्ह

‘पुट्टेवार’प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गप्प का?; पोलीस कारवाईवरही प्रश्नचिन्ह

अपघात असल्याचे भासवून सुपारी देत सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगररचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार हिच्या गडचिरोलीतील अनेक कारनाम्यांची चर्चा आहे.

गडचिरोली : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

संपत्तीसाठी सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगररचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) आणि तिचा भाऊ सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग विभागाचा संचालक प्रशांत पार्लेवार या दोघांकडे असलेल्या कोट्यवधीच्या मालमत्तेसंदर्भातील माहिती पोलीस तपासात समोर आली होती. परंतु याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अद्याप कोणतीही भूमिका न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सोबतच पुट्टेवार हिने रचलेल्या कटात सहभागी असल्याचा संशय असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील काँग्रेस नेत्यालाही अभय दिल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही संशय व्यक्त केला जात आहे.

अपघात असल्याचे भासवून सुपारी देत सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगररचना विभागाची सहायक संचालक पुट्टेवार हिच्या गडचिरोलीतील अनेक कारनाम्यांची चर्चा आहे. पोलीस तपासादरम्यान तिच्या शेकडो कोटींच्या संपत्तीची माहितीही पुढे आली. शासकीय नोकरीत असतानाही अर्चना आणि तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार याने गैरमार्गातून कोट्यवधीची संपत्ती जमा केली. संपत्तीच्या लालसेतून सासऱ्याची हत्या केली. या प्रकरणात दररोज नवीन माहिती पुढे येत असून अद्याप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मौन बाळगले असल्याने शंका उपास्थित केल्या जात आहे.

पुट्टेवार हिच्या कार्यकाळात हजार कोटींच्यावर मूल्य असलेल्या भूखंडांना अवैध मंजूरी देण्यात आल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. तिने जिल्ह्यातील भूमाफियांना हाताशी धरून हजारो कोटींच्या भूखंडांना नियमबाह्यपणे अकृषक केल्याची तक्रार करण्यात आली आहे. यात देसाईगंज येथील एका काँग्रेस नेत्याचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस तपासातही त्याचे नाव पुढे आल्याची चर्चा आहे. संपत्तीच्या प्रकरणातून घडलेल्या या हत्याकांडात पोलिसांनी केलेल्या कारवाईवर शंका उपास्थित केल्या जात असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे या विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. पोलीस कोठडीनंतर सर्व आरोपिंची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून आता पोलीस काय कारवाई करणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!