नागपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
नागपुरातील कन्हान नदीच्या पुलावर रविवारी भरधाव वेगात जाणारी खासगी बस आणि ऑटो रिक्षा यांच्यात धडक झाली. या अपघातात लष्कराच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, दीन प्रधान, कुमार पी, शेखर जाधव, अरविंद, मुरुगन आणि नगररत्नम अशी जखमी जवानांची नावे आहेत.
काल नागपुरात भीषण अपघात झाला. कन्हान नदीच्या पुलावर भरधाव वेगाने जाणारी खासगी बस आणि ऑटो रिक्षा यांच्यात धडक झाली. या अपघातात लष्कराच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जवान आणि ऑटोचालक जखमी झाले आहेत.
कन्हान नदीच्या पुलावर भरधाव वेगाने जाणारी खासगी बस आणि ऑटो रिक्षा यांच्यात धडक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात लष्कराचे ७ जवान आणि ऑटोचालक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सैनिकांपैकी विघ्नेश आणि धीरज राय यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर संतप्त स्थानिकांनी बसची तोडफोड केली आणि नागपूर-जबलपूर महामार्ग रोखून धरला. या धडकेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले.