चंद्रपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाण अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोळसा खाण अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्याची मुजोरी त्यांच्या चांगलीच अंगलट आली. प्रवीण काकडे यांच्यासह अन्य नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समोरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. विशेष म्हणजे शिवीगाळ करण्यात खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे आघाडीवर होते. या प्रकाराची तक्रार KPCL कंपनीतर्फे भद्रावती पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी प्रवीण काकडे यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. खासदार धानोरकर यांच्या प्रतिमेला या घटनेमुळे मोठा धक्का पोहोचला.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाण आहे. या खाणीतील कोळसा वाहतुकीमुळे पिकांना मोठा फटका बसू लागला आहे. सोबतच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत. या प्रश्नांना घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी काल गेल्या होत्या. त्यांच्यासोबत भाऊ प्रवीण काकडे आणि असंख्य कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त होते. अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच प्रवीण काकडे यांनी अधिकाऱ्याला विचारपूस करता करता शिवीगाळ केली आणि त्याचवेळी एका व्यक्तीने त्या अधिकाऱ्यांना कानाखाली लगावली. अधिकाऱ्यांना सर्वांनी शिवीगाळ करणे सुरू केले. यासगळ्या घोळामुळे मुख्य प्रश्न बाजूला पडल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.