मुंबई : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
बुलढाणा जिल्हयातील मेहकर येथील शाहू फुले आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ते तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपभाऊ गवई यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड केल्याचे पत्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब व सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष पंडीतजी कांबळे साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन मुंबई येथे दि.18/06/2024 रोजी देण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सुरणर, लातुर जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, धाराशिव जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, घनःश्याम शिंदे,समाज भुषण विवेक साळुंके, राजू कांबळे, नरसिंग गायकवाड, कुणाल माने,महिला आघाडी ललीताताई मगरे,रोहीणीताई चव्हाण,संघमित्रा एटम,प्रतिभा गवई आदी उपस्थित होते. या वेळी संदीप गवई यांनी सांगितले की मी बुलढाणा जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुळ बळकट करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत राहील व आपले संपर्क कार्यकर्त्यांसोबत ठेवण्याचा प्रयत्न करीत राहिल.सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे