Thursday, March 20, 2025
HomeUncategorizedविज पडण्याची सूचना देणार ‘दामिनी’ ॲप, वापरून पडणाऱ्या वीजेपासून संरक्षण करण्याचे...

विज पडण्याची सूचना देणार ‘दामिनी’ ॲप, वापरून पडणाऱ्या वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन

गडचिरोली : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

मान्सून कालावधीत विशेषतः जून व जुलै या महिन्यात विज पडून जिवीतहानी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. विज पडून जिवीत हानी होऊ नये, या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी “दामिनी ” अॅप तयार केले आहे. हे दामिनी ॲप विज पडण्याची सूचना देणारआहे. त्यामुळे नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी ॲप वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सदरचे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करावा व इतरांनाही दामिनी ॲप वापरण्यास प्रवृत्त करावे.

सदरचे अॅप जीपीएस लोकेशन ने काम करीत असून त्यात विज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी सूचना देण्यात येते. सदरच्या अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. अॅपमध्ये आपले सभोवताल विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे. तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये.
गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सदर ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अलर्ट नुसार आवश्यक पूर्वसुचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांनी केले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!