Tuesday, April 22, 2025
HomeUncategorized१७ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून केली निर्घृण हत्या

१७ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून केली निर्घृण हत्या

गोंदिया : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

गोंदिया शहरात सातत्याने हत्यांचे प्रकरण समोर येत आहे, शहरातील भीमनगर परिसरात एका तरुणाची हत्या झाल्याचे प्रकरण समोर आले आहे, आरोपींनी मध्यरात्री एका १७ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना दी. १८ जून रोजी उघडकीस आली, उज्वल मेश्राम (१७) असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा गोंदिया शहरातील रहिवासी असून रात्रीच्या सुमारास भीमनगर परिसरात अज्ञात आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला यात उज्वल याचा जागीच मृत्यू झाला.

तक्रारदार मंजू निशांत मेश्राम वय 32 वर्ष रा. भीमनगर यांचे तक्रारीवरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप. क्र. 392/2024 कलम 302, 34 भादंवि अन्वये दिनांक 19-06-2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्यातील एक 22 वर्षीय आरोपी अंकित घनश्याम गुर्वे यास जेरबंद केले असून, याच खुनात त्याचा साथीदार असलेला 21 वर्षीय दुसरा आरोपी राहुल प्रशांत शेंडे अद्याप फरार आहे. घटनास्थळावरून दोन चाकू मिळाले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. रेल्वेमध्ये आरोपी आणि मृतक यांचे वेंडरशिप असून जुन्या वादातून व आर्थिक लेवान घेवाणीतून ही हत्या झाल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी बानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!