गोंदिया : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
जहाल माओवादी पहाडसिंग याचा अंगरक्षक म्हणून काम करणारा तसेच दर्रेकसा एरिया कमिटी, प्लॉटून -१, व (सी.एन. एम.) चेतना नाटय मंच मध्ये काम करणारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पोलिस नक्षल चकमकीत काम करणाऱ्या जहाल नक्षलवादी संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम (२५) रा. पुसनार, ता. गंगालूर, जि. बिजापूर ( छत्तीसगड) असे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्याचे नाव आहे. त्याच्यावर ७ लाखाचे बक्षीस होते.
देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पण योजना राबवित आहे. या आत्मसमर्पीत नक्षलवादी बीच्छेम याने जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्यासमक्ष नक्षलवाद्यांच्या त्रासाला कंटाळून ३ जून रोजी आत्मसमर्पण केले आहे. संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम याने सन २०१७-२०१८ मध्ये प्लॉटून-१ मध्ये कार्यरत असताना गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत मुरकुटडोह, टेकाटोला, तसेच चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत कोसबी जंगल परिसरात घडलेल्या नक्षल- पोलीस चकमकीत सक्रीय सहभाग होतानका
माओवाद्यांच्या भूलथापाला बळी पडू नका
माओवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता गोदिया जिल्हयात प्रभावी नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येत आहे. विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची जनतेला, नागरिकांना माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे. जे माओवादी विविध भूलथापा आणि प्रलोभनांना बळी पडून माओवादी संघटनेत भरती झाले आहेत. त्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.