Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedसावली तहसील कार्यालयात मुद्रांक (स्टॅम्प)विक्रेत्यांची नेमणूक करा - नगरसेवक सतीश बोम्मावार ...

सावली तहसील कार्यालयात मुद्रांक (स्टॅम्प)विक्रेत्यांची नेमणूक करा – नगरसेवक सतीश बोम्मावार यांची मागणी

सावली : (तालुका प्रतिनिधी)

सावली तहसील कार्यालयातील दोन्ही मुद्रांक विक्रेत्यांचे निधन झाल्याने त्यांच्या वारसांना किव्हा नवीन मुंद्राक विक्रेत्यांची नेमणूक करावी अशी मागणी भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी शासनाकडे केली आहे.

सावली शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात दोन मुद्रांक विक्रेते होते मात्र यातील यादव मोहूर्ले यांचे गेल्या तीन वर्षांपूर्वी तर तुळशीराम गेडाम यांचे नुकतेचे निधन झाले. त्यामुळे सावली शहरात आता मुद्रांक विक्रेता उरलेला नसल्याने चांगलाच तुटवडा निर्माण झालेला आहे.

सध्या सावली शहरांमध्ये एकही मुद्रांक (स्टॅम्प)विक्रेता नसल्याने शासकीय व इतर कामासाठी लागणारे स्टॅम्प आणायचे कुठून असा प्रश्न यावेळी अनेक नागरिकांना पडलेला आहे त्यामुळे सावली शहरात आता स्टॅम्प साठी मुल, गडचिरोली, चंद्रपूर या परिसरात जाऊन स्टॅम्पची खरेदी करावी लागत आहे.

त्यामुळे सावली तालुक्यातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता सावली तहसील कार्यालय परिसरात ज्या जुन्या मुद्रांक विक्रेते होते त्यांच्या वारसांना किंवा नव्या मुद्रांक विक्रेते यांची नेमणूक करावी व नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ,आमदार तथा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर व तहसीलदार सावली यांना निवेदनाद्वारे केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!