मुंबई : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विशेष सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना दंड ठोठावला आहे. त्यांना ८ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपने कोरोना काळात केलेल्या आंदोलनात मारहाण प्रकरणी भाजपच्या २० पदाधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात खटला सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोरोना काळात वीज दरवाढीविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनावेळी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात भाजपच्या २० पदाधिकाऱ्यांविरुद्ध सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. य़ा खटल्याच्या सुनावणीला राहुल नार्वेकर हे गैरहजर राहिल्यानं न्यायालयाने दंड ठोठावला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विशेष सत्र न्यायालयाने दणका दिला. खटल्याच्या सुनावणीला हजर न राहिल्यानं ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आता त्यांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे.