Tuesday, November 12, 2024
HomeUncategorizedनक्षल्यांच्या गडाला लागला भुसुरुंग

नक्षल्यांच्या गडाला लागला भुसुरुंग

लाहेरी हद्दीतील पाच गावांनी पारित केला नक्षल गाव बंदीचा ठराव

गडचिरोली : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

भामरागड तालुक्यातील उप पोलीस स्टेशन लाहेरी हे महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेच्या टोकावरील अति नक्षलग्रस्त,अति संवेदनशील पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जाते. नक्षलांचा सर्वाधिक वर्चस्व असणारा हा भाग आहे. या भागामध्ये नक्षल्यांचा नागरिकांवर खुप दबदबा व वर्चस्व होते.यामुळे प्रशासनाला काम करण्यास प्रचंड अडचण होत असते व तेथील नागरिकां पर्यंत पोहोचणे , विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होत होता. परंतु गडचिरोली पोलिसांमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना त्यामध्ये आरोग्य, कृषी महिला, रोजगार,पोलीस प्रशिक्षण, दिव्यांग, मेळाव्याचे मार्फतीने लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून जास्तीत जास्त विविध शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांप्रती आत्मीयतेची भावना निर्माण झाली. तसेच मागील काही वर्षांपासून निष्पाप नागरिकांची नक्षल्यांनी केलेली कत्तल, आर्थिक नुकसान, जाळपोळ, विकास कामात अडथळा यामुळे नक्षलां विरोधात जनमत तयार झाले आहे व अलीकडील काळात झालेले समाज प्रबोधन, यामुळे नागरिकांना लक्षात आले की नक्षल हे आपल्या जीवनातील अडथळा आहेत त्यामुळे त्यांच्या दबावाला झुगारून देऊन आज दिनांक 24 जून 2024 रोजी उप पोलीस स्टेशन लाहेरी हद्दीतील एकूण पाच गावांनी स्वतः पुढाकार घेऊन सन २००३ नक्षल गावबंदी योजने अंतर्गत नक्षल गावबंदी ठराव सर्वानुमते पारित केला आहे.तसेच यापुढे कुठल्याही नक्षल संघटनांना गावात प्रवेश दिल्या जाणार नाही तसेच त्यांना राशन ,पाणी देण्यात येणार नाही तसेच त्यांच्या कुठल्याही मीटिंगसाठी हजर राहणार नाहीत. कुठल्याही हिंसक कारवायांमध्ये सहभागी होणार नाही,कुठलेही ट्रेनिंग करणार नाही.अशी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसमोर नागरिकांनी शपथ घेऊन उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे ठराव संमत करून त्याबाबत लेखी हमीपत्र प्रभारी अधिकारी लाहेरी यांच्याकडे सुपूर्त केले. तसेच नक्षल्यांनी पोलिसांना नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने जंगल परिसरामध्ये खड्डे खोदून त्यात मोठ्या प्रमाणावर रोवून ठेवलेली लोखंडी सलाख (२०० ते ३००) मौजामोरडपार, आलदंडी, मुरुंगल,कोयर, गोपणार, येथील नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे जमा केले. तसेच नक्षल्यांनी जंगलात लपून ठेवलेले एकूण पाच भरमार बंदूक उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे जमा केले. या गावातील नक्षलबंदी ठरावामुळे हद्दीतील नागरिकांमध्ये भीती मुक्त वातावरण तयार झाले आहे. हा नक्षल चळवळीला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे अति दुर्गम भागामध्ये विकासाची दारे खुली झाली आहेत.
गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी चळवळीमध्ये हा एक ऐतिहासिक टप्पा/यश मानले जात आहे. या यशामध्ये नागरिकांची दूरदृष्टी, पोलीस दादालोरा खिडकी, पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख सर, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री एम. रमेश सर, उपविभागीय पोलिस अधिकारी भामरागड श्री अमर मोहिते सर, उप पोलीस स्टेशन लाहेरी प्रभारी अधिकारी श्री संतोष काजळे, प्रशांत डगवार, सचिन सरकटे, आकोश पुयड,व सर्व अंमलदार यांचे मोलाचे योगदान आहे.

पोलिस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल यांनी या सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे व धन्यवाद मानले आहेत तसेच पोलिसांना असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी असेच सहकार्य केल्यास नक्षलवादाचे समुळ उच्चाटन होण्यास मदत होईल व विकासाला चालना मिळेल असे प्रतिपादन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!