मुल : (प्रतिनिधी)
आगामी विधानसभा निवडणुकीच्यां अनुषंगाने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हाप्रमुख मान.संदिपभाऊ गिऱ्हे यांनी बुध, बिएलओ व गाव प्रमुखांना सर्वांना पक्षाचे मोलाचे मार्गदर्शन केले.मुल तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या बुध व शाखा प्रमुखांची बैठक मातोश्री सभागृहात घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील बुध प्रमुख व बिएलओ प्रमुखांची व गावातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक याचे वर मार्गदर्शन केले.शहारातील काही युवक शिवसेना पक्षात प्रवेश केले.तसेच यावेळी तालुका प्रमुख तथा ग्राम पंचायत सदस्य प्रशांत गट्टूवार व तालुका संघटक रवी शेरकी,शहर प्रमुख आकाश राम तथा माजी तालुका प्रमुख सुनील काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील प्रत्येक गावात,वार्डात,प्रभागात शिवसेनेचा कार्य,मशाल चिन्ह पोहचवा व आपल्या क्षेत्रातील समस्या विरुध्द उठाव करा.शिवसेनेचा ब्रीद ८०% समाजकारण व २०% राजकारण या ध्येय धोरणा प्रमाणे काम करा,मुल तालुक्यासाठी रुग्णवाहिका मोफत सेवा जनतेच्या सेवें साठी आहे,त्याच गावागावात वापर करा,रुग्णांना अथवा तालुक्यातील नागरिकांना कुठलाही त्रास झाला की शिवसेना जनसंपर्क कार्यालय आपल्या सेवें साठी चोवीस तास खुले आहे.असे शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गीऱ्हे आढावा बैठकीत आवाहन केले.यावेळी उपस्थित तालुक्यातील सर्व उपतालुका प्रमुख,विभाग प्रमुख शाखा प्रमुख बूथ प्रमुख पदाधिकारी सदस्य व आजी माजी,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.