गडचिरोली : (सतीश आकुलवार मुख्य संपादक)
जिल्हा परिषद पदभरती-2023 अंतर्गत पदभरतीचे प्रथम नियुक्ती आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी नियोजन भवन येथे विस्तार अधिकारी यांना देण्यात आले.
याप्रसंगी आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह उपस्थित होते.
जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या विविध संवर्गाकरीता
ऑगस्ट 2023 मध्ये पदभरतीची जाहिरात देण्यात आली होती. यातील विस्तार अधिकारी(शिक्षण) जितेंद्र सहाळा यांना उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्ती आदेश देण्यात आले. त्यांचेसह आतापर्यंत लघुलेखक (उ.श्रे) व लघुलेखक (नि.श्रे.), पदांकरीता निवड झालेल्या एकूण 3 उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. संवर्गनिहाय एकत्रीत गुणवत्ता यादीनुसार जिल्हा निवड समितीच्या मान्यतेने रिगमन, वरिष्ठ सहायक लेखा प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लघुलेखक (उ.श्रे), लघुलेखक (नि.), आरोग्य पर्यवेक्षक, वरीष्ठ सहाय्यक (लि), विस्तार अधिकारी (शि), कनिष्ठ सहाय्यक (लि), कनिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी (कृषी), कनिष्ठ अभियंता (स्था), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी या संवर्गाच्या उमेदवारांची दस्ताऐवज पडताळणी पुर्ण करण्यात आलेली आहे. त्यापैकी रिगमन-1 पद, विस्तार अधिकारी (शि)- 1 पद, लघुलेखक (उ.श्रे) 1 पद, लघुलेखक (नि.)- 1 पद, कनिष्ठ लेखा अधिकारी 1 पद, वरिष्ठ सहाय्यक (ले)- 1 पद या 6 संवर्गाची अंतिम निवड व प्रतिक्षा सुची प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद पदभरतीची कार्यवाही जिल्हाधिकारी संजय दैने यांचे मार्गदर्शनाखाली व श्रीमती आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली यांचे नेतृत्वात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) शेखर शेलार, तसेच पदभरती संबंधीत सर्व विभागाचे खाते प्रमुख हे पार पाडत आहेत.