Thursday, December 5, 2024
HomeUncategorizedखासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

चंद्रपूर : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी मिळण्यासाठी रस्ते मार्ग आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे आज (दि.२८) भेट घेतली.

सर्वांगीण विकासाकरीता निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. चंद्रपूर लोकसभा क्षेत्र हे बहुतांश आदिवासी बहुल असून ग्रामीण भागाचा जास्त समावेश असणाऱ्या या लोकसभा क्षेत्रात रस्त्यांचा विकास व्हावा, यासाठी खासदार धानोरकर यांनी निवेदन देऊन चर्चा केली. यात प्रामुख्याने वरोरा-चिमुर प्रलंबित महामार्ग तत्काळ पूर्ण व्हावा. याकरीता आपल्याकडून प्रयत्न केले जावे, अशी विनंती केली.

या कामांसाठी निधी देण्याची मागणी

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील कोंढा – माजरी – पाटाळा-मणगांव-थोराणा-वरोरा-मोहबाळा या कामांकरीता ७० कोटी, भद्रावती तालुक्यातील माजरी- पळसगांव- नंदोरी- भटाळी- चोरा- चंदनखेडा या रस्त्याकरीता ४० कोटी, वरोरा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ३७१ ते पिंपळगाव (सिंगरु) ते तुमगाव वाही या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाकरीता ५० कोटी, भद्रावती तालुक्यातील सुमठाणा-तेलवासा-जुनाळा रस्त्याचे रुंदीकरणासह बांधकाम करण्याकरीता ७५ कोटी, तसेच राजुरा तालुक्यातील वरुर-विरुर धानोरा-आर्वी रस्त्याकरीता ४६ कोटी, तसेच सास्ती-कोलगांव – कढोली – चढी- निरली-धिंडसी-मार्डा या रस्त्याकरीता १३ कोटींची मागणी करुन निधी उपलब्ध करण्याची विनंती करण्यात आली.

मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वरोरा-चिमुर रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या. त्यासोबत वरील कामांकरीता निधी लवकरच उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!