दिल्ली : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. विमानतळाच्या टर्मिनल-१ चे लोखंडी छत कोसळले असून यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. विमानतळाच्या टर्मिनल-१ चे लोखंडी छत कोसळले असून यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी मोठा अपघात झाला. विमानतळाच्या टर्मिनल-१ च्या लोखंडी छताचा काही भाग कोसळला. यामुळे अनेक गाड्यांचा चुराडा झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून बचाव कार्य सुरू करण्यात आहे.
दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना सकाळी ५.३० च्या सुमारास घडली. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-१ वर टर्मिनल वनच्या बाहेरील लोखंडी खांबांना सपोर्ट देऊन उभे केलेले लोखंडी छत अचानक कोसळले. या अपघातात छताला आधार देण्यासाठी वापरलेले जड लोखंडी खांब टर्मिनलबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांवर कोसळल्याने यामध्ये गाड्यांचे नुकसान झाले आहे. छत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. शुक् दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून या पावसादरम्यान हा अपघात झाला. या घटनेमुळे विमानतळावर मोठा गोंधळ उडाला.