पुणे : (सतीश आकुलवार, मुख्य संपादक)
पुणे-बंगळूरू महामार्गावर हावेरी जिल्ह्यातील ब्याडगी तालुक्यातील गुंडेनहल्ली जवळ शुक्रवारी (28 जून) पहाटे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 13 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे.
भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. सर्व भाविक देव दर्शन करून परत येताना त्यांच्यावर काळाने झडप घातली आहे. मृत भाविक हे शिवमोग्गा येथील रहिवासी आहेत.
मिळालेली माहिती अशी, की शिवमोग्गा काही भाविक सावदट्टी येथे मयम्मा देवस्थानी गेले होते. देवदर्शन करून परत येत असताना पुणे-बंगळूरू महामार्गावर हावेरी जिल्ह्यातील ब्याडगी तालुक्यातील गुंडेनहल्ली जवळ भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता, की 13 भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.अपघातानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर तातडीने दाखल झाले. मृत नागरिक आणि जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमीवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.