एटापल्ली : (उमेश गझलपेल्लीवार, तालुका प्रतिनिधी)
राज्यात विदर्भात 1 जुलै पासून शाळा सुरु होत असल्याने जिल्ह्यात शिक्षण देणे व शाळा मॉडेल निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.म्हणून जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी मा. आयुषी सिंह यांनी अतिदुर्गम भागातील शाळांना भेट देत तेथील समस्या जाणून घेत आहेत.
शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये जिल्ह्यातील सर्व शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे व प्रत्येक केंद्रात मॉडेल शाळा निर्माण करून भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी मा. आयुषी सिंह मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली हे उत्सुक आहेत.
जिल्ह्यात पहिल्यांदाच मुख्यकार्यकारी अधिकारी अतिदुर्गम भागात भेटी देऊन सर्व समाश्याचे निराकरण करण्याचे प्रयत्न करत आहेत हे विशेष बाब आहे.
अतिसंवेदनशील भागात असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस आवासिय विद्यालय गट्टा येथे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन शिक्षकांशी सकारात्मक चर्चा करून शाळेतील समस्या जाणून घेऊन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
एकंदरीत या सत्रात जिल्ह्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल अशी सर्व सामान्यांची आशा पल्लवित झाला आहे.