चामोर्शी : (उमेश गझलपेल्लीवार, तालुका प्रतिनिधी)
पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा रै येथे दिन जुलैला स्टार प्रकल्प अंतर्गत शाम पूर्व तयारी मेळावा क्रमांक दोन मोठ्या थाटात संपन्न झाला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कु गीता शेंड ह्या होत्या उद्घाटन केंद्राचे केंद्रप्रमुख गुरुदास गोमासे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी प्रमुख आतिशी म्हणून भुजंगराव कोडाप ज्योतीताई कोसमशिले साधनव्यक्ती घनश्याम वांढरे आदि मान्यवर उपस्थित होते शैक्षणिक वर्ष2024-25 मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठी हा मेळावा आयोजित केला जातो यात निरनिराळ्या सात स्टॉल्सवर भरती पात्र विद्यार्थ्यांचा भावनिक सामाजिक बौद्धीक गणन भाषिक शारिरीक व मानसिक विकसन याक्षमता प्रामुख्याने तपासल्या गेल्या पालकांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले यावेळी भरती पात्र विद्यार्थ्यांना आनंद व्हावा म्हणून रंगीत टोप्या देण्यात आल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना फुगा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पालकांनीही यात उत्स्फुर्त सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय दुधबावरे यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रमोद बोरसरे यांनी केले
याप्रसंगी पालकांसाठी अल्पोपहार विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक बिस्किटांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुदास सोनटक्के अभिषेक लोखंडे अंजली तंगडपल्लीवार अनिल दुर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले